जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे नाशिक विभाग यांचा नुकताच आज दुपारी १ वाजेला निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सेंट टेरेसास् काँन्व्हेंट इंग्लिश मिडीयम हाय स्कूल, जळगाव या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेने इयत्ता दहावीच्या निकालात यंदाही शाळेने उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
१० वी चा निकाल दरवर्षी प्रमाणे यंदाही १००% लागला आहे. यामध्ये सेंट टेरेसास् काँन्व्हेंट इंग्लिश मिडीयम हाय स्कूल,१० वी च्या परीक्षेत अपूर्व यश संपादन करत संपूर्ण विद्यालयाचा गौरव वाढविला आहे. यामध्ये गेही जेनिशा अनिल ह्या विद्यार्थिनीने ९९.६० टक्के तर मुलांमध्ये दहाळे हर्षुल महेश याने ९८.६० टक्के मिळविले आहे. त्यांच्या यशाबद्दल शाळा, शिक्षक, पालक व मित्र परिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यंदाच्या निकालात प्रथम क्रमांक पटकावत गेही जिनिशा अनिल ९९.६० ही प्रथम क्रमांकाने पास झाली असुन, रायसिंघानी ईशिका जितेंद्र ९८.६० द्वितीय, दहाळे हर्षुल महेश ९८.६० तृतीय तर फालक दर्शन मिलिंद हा ९८.४० गुणंसह चैथ्या क्रमांकाने उर्त्तीण झाला असुन, दहाळ हंसिका भूषण ९८.२० गुणंसह पाचवा क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या मेहनतीला यश मिळवलं आहे. या उज्वल निकालामागे टेरेसीयन संस्थेतील सर्व आदरणीय सिस्टर्स, शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाचे मोठे योगदान मिळालेले आहे. त्यांना मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन!
टिप्पणी पोस्ट करा