Top News

जळगाव समाजकल्याण व यावल आदिवासी प्रकल्प राज्यात अव्वल


मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यात उत्कृष्ट कामगिरी; सेवा गती, पारदर्शकता व नवोपक्रमांची घवघवीत यशकथा

जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I राज्य शासनाच्या 'सुखर जीवनमान' अभियान आणि मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या कृती आराखडा उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्याच्या समाजकल्याण विभाग व यावल आदिवासी विकास प्रकल्पाने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. उपायुक्त योगेश पाटील आणि प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या नेतृत्वाखाली हे यश मिळाले.
समाजकल्याण विभागाने १०० टक्के निधी खर्च, ११ आढावा बैठकांचे आयोजन, आणि जलद लाभ पोहचवण्यात यश मिळवले. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत ७३९, तर वयोश्री योजनेत २९,७८२ ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळाला. ८९.३ कोटींचा निधी वेळेत वितरित करण्यात आला. नवोपक्रमांमुळे विभागाची कार्यक्षमता राज्यात सर्वाधिक ठरली.

दरम्यान, यावल आदिवासी प्रकल्पाने ई-ऑफिस, अभिलेख व्यवस्थापन, कर्मचारी नोंदी अद्ययावत करणे, आश्रमशाळांचे सुशोभीकरण आणि १०० टक्के निर्लेखन यांसारख्या बाबींमध्ये उत्कृष्ट कार्यप्रदर्शन करत राज्यात स्वतःची ठसा उमटवला. या प्रकल्पाच्या पारदर्शक आणि गतिमान कार्यपद्धतीचे राज्यभर कौतुक होत आहे.

उपायुक्त योगेश पाटील यांनी सांगितले की, “विभागातील प्रत्येक घटकाच्या नियोजनबद्ध अंमलबजावणीमुळेच ही कामगिरी शक्य झाली.” तर अरुण पवार यांनी म्हटले की, “सेवा दाराशी पोहोचवून आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत.”

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने