जळगावात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्याचा धक्कादायक प्रकार
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात शासकीय कर्मचाऱ्याचा गुटखा खाण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयातच घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
प्राप्त माहितीनुसार, संबंधित कर्मचारी नियमितपणे कार्यालयीन वेळेत गुटखा सेवन करत असल्याची तक्रार काही नागरिकांनी केली होती. यानंतर अचानक करण्यात विजिट करत असतांना तपासणीत तो कर्मचारी प्रत्यक्ष गुटखा खात असतानाच आढळून आला. त्याला विचारले तर उलट सुलट बोलायला लागला.
शासकीय कार्यालय म्हणजे नियम, शिस्त आणि जनतेच्या विश्वासाचे प्रतीक असते. मात्र, अशा ठिकाणी अशा प्रकारचे वर्तन हे केवळ कायद्याचे उल्लंघन नाही, तर शासकीय यंत्रणेच्या शिस्तीला कलंक लावणारे आहे. महाराष्ट्र शासनाने गुटखा आणि तत्सम तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घातलेली असून, सार्वजनिक ठिकाणी अशा पदार्थांचे सेवन करणे कायद्याने गुन्हा आहे.
या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी सुद्धा अश्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत आहे, असे निदर्शनास आले. दोषी कर्मचारी विरुद्ध योग्य ती शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे.
या घटनेवर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून, शासकीय कार्यालयात शिस्त आणि आरोग्याचे नियम पाळले जाणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात अन्य कर्मचारी असा प्रकार करणार नाहीत.
सरकारी कार्यालयांतील अशा प्रकारांमुळे जनतेचा शासकीय यंत्रणांवरील विश्वास डळमळीत होतो. त्यामुळे प्रशासनाने वेळेत आणि कठोर पावले उचलून समाजात चांगला संदेश द्यावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा