जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I राधे कृष्ण वारकरी शिक्षण संस्था, जळगाव यांच्या वतीने "भव्य बाल वारकरी संस्कार शिबिर" आयोजित करण्यात आले असून, हे शिबिर गुरुवार, ८ मे २०२५ पासून गुरुवार, २२ मे २०२५ या कालावधीत पार पडणार आहे. चंदू रामभाऊ नगर परिसर, समर्थ नगर, बेंच हॉल रोड, जळगाव येथे हे शिबिर होणार आहे.
या शिबिराचे मार्गदर्शन ह.भ.प. गजानन महाराज, दापोरीकर करणार आहेत. त्यांना ह.भ.प. मोथे बाबा (आकोले) आणि ह.भ.प. राठोडी बाबा (कु-हेर) यांचे आशीर्वाद लाभले असून अनेक अनमोल सहकार्यकर्त्यांनी या शिबिराला हातभार लावलेला आहे.
शिबिराची वैशिष्ट्ये : धर्मसंस्कार, एकपात्री, तबला, गायन, श्रीरामरक्षा पठण, सुभाषिते, संस्कार वर्ग, योगासने, नियमित जीवन, मातृ-पितृ पूजन, वाठवण भजन, हरिपाठ, भागवत कथा, दुर्गा सप्तशती कथा, कीर्तन
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
शिबिरात संगीत वादन, वाचन, प्रवचन, नृत्य, नाट्य, व्याख्यान, कीर्तन इत्यादी सर्जनशील उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्मिक व नैतिक मूल्यांची रुजवणूक केली जाणार आहे.
विशेष आकर्षण: महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार गायक वादक गुणिजन – ह.भ.प. गुणिजन महाराज डोंगरे यांचे मार्गदर्शन विशेष आकर्षण ठरणार आहे.
प्रवेश फी फक्त १०० रुपये ठेवण्यात आली आहे. अनाथ विद्यार्थ्यांना प्रवेश मोफत दिला जाणार आहे. तसेच जे पालक आपापल्या दिवंगत नातेवाईकांच्या स्मरणार्थ किंवा वैयक्तिक कारणास्तव सेवा देऊ इच्छितात त्यांनी आयोजकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिबिराचे आयोजक ह.भ.प. गोपाल महाराज, दापोरीकर असून ते राधे कृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. संपर्कासाठी ७०५७०५१२५४ या क्रमांकावर संपर्क साधावा.
टिप्पणी पोस्ट करा