सावखेडा शिवारात लाईट गायब; वीज विभागाचा संपर्क तुटलेला, लाईट गेलेली... पाऊस गेलेला... पण जबाबदार अधिकारी गायब!
जळगाव, प्रतिनिधी I आज सायंकाळी अचानक आलेल्या वादळामुळे जळगाव शहरातील वीज व्यवस्था पूर्णतः कोलमडली. विजेची पुरवठा सेवा खंडित झाल्यानंतर शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. सुमारे दोन तास पडलेल्या या मुसळधार पावसामुळे जळगाव शहरातील अनेक भाग जलमय झाले.
पावसाने ओसरले असले तरी लाईट गेलेली स्थिती अजूनही कायम आहे. विशेषतः सावखेडा शिवार भागात रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. या भागातील नागरिकांनी कोल्हे हिल्स येथील महाराष्ट्र राज्य वीज मंडळ (MSCB) कार्यालयासह संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
वीजखोळंब्यामुळे नागरिकांना अंधारात वेळ काढावा लागत असून, घरातील वृद्ध, लहान मुले आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संपर्क न झाल्यामुळे आणि प्रशासनाकडून कुठलाही ठोस प्रतिसाद न मिळाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.
तत्काल वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करत नागरिकांनी वीज वितरण कंपनीने या गंभीर स्थितीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
वीज वितरण अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद नाही; नागरिकांची नाराजी
नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणे हे अतिशय गंभीर आणि निषेधार्ह आहे. वीज वितरण अधिकाऱ्यांनी जनतेच्या समस्या ऐकून त्वरित उपाययोजना करणे अपेक्षित आहे. नागरिकांनी वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद न मिळाल्यास, ही बाब संबंधित उच्च अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे. जनतेच्या सुविधांसाठी कार्यरत असलेल्या यंत्रणांनी उत्तरदायित्व पाळणे अत्यावश्यक आहे.
टिप्पणी पोस्ट करा