जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I पाणीपुरवठा विभागात काम करणाऱ्या तिघा कर्मचाऱ्यांना लाच घेताना अँन्टी करप्शन ब्युरोच्या जळगाव युनिटने रंगेहात पकडले. लायसन्स नुतनीकरणासाठी ६०० रुपयांची लाच स्वीकारतानाच ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदार हे प्लंबर असून, दरवर्षी लायसन्स नुतनीकरणासाठी भुसावळ पाणीपुरवठा विभागात गेले होते. तिथे कंत्राटी कामगार शाम समाधान साबळे (वय २८) याने ७०० रुपयांची लाच मागितली. यानंतर त्याने अभियंता सतीश सुरेशराव देशमुख यांना कॉल केला असता, त्यांनी ६०० रुपये द्यावेत असे सांगितले.
त्यानंतर तक्रारदार लाच रक्कम घेऊन गेले असता साबळेने लिपिक शांताराम उर्खडु सुरवाडे (वय ५७) यांना फोन करून पैसे घेण्यास सांगितले. सुरवाडे यांनी ६०० रुपये घेतले आणि त्याच वेळी सापळा कारवाई झाली.
लाचेची मागणी व स्वीकार: २३ एप्रिल २०२५, मागणी: ७०० रुपये, स्वीकारलेली रक्कम: ६०० रुपये, आरोपींची नावे: 1. शाम समाधान साबळे – कंत्राटी कामगार, 2. सतीश सुरेशराव देशमुख – वर्ग ३ अभियंता, 3. शांताराम उर्खडु सुरवाडे – वर्ग ४ लिपिक, झडतीमध्ये मिळालेले साहित्य:, आरोपी १: Vivo मोबाईल, आरोपी २: २१६० रुपये व OnePlus मोबाईल, आरोपी ३: १००० रुपये व Vivo मोबाईल त्यांच्याकडून सर्व मोबाईल जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
पर्यवेक्षण: पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि., जळगाव, तपास अधिकारी: पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि., जळगाव, पथक सदस्य: सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार व पोलीस कर्मचारी, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र.
नागरिकांना आवाहन
शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणी लाच मागत असल्यास अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव येथे संपर्क साधावा.
दूरध्वनी: ०२५७-२२३५४७७, टोल फ्री: १०६४
टिप्पणी पोस्ट करा