३५ रक्तदात्यांनी दिले रक्तदान, विजय वाणी यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I मोनाली कामळस्कर फाऊंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले १३वे रक्तदान शिबिर आज बुधवार, दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजता रेडक्रॉस सोसायटी, जळगाव येथे अत्यंत उत्साहात पार पडले. या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे फाउंडेशनचे उपाध्यक्ष, समाजाचे माजी अध्यक्ष तसेच जनवाणी पतपेढीचे विद्यमान चेअरमन विजय नारायण वाणी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम होता.
कोरोना काळात सुरू झालेली ही शिबिरांची मालिका आजही अखंडपणे सुरू असून, समाजात रक्तदानाविषयी जागरूकता वाढविण्यासाठी फाऊंडेशन सातत्याने प्रयत्नशील आहे. या वेळच्या शिबिरात ३५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत रक्तदान केले.
रक्तदात्यांना विजय नारायण वाणी यांच्या वतीने थंड पाण्याच्या बाटल्यांचे आकर्षक वाटप करण्यात आले. कार्यक्रमात श्री. अजय कामळसकर आणि त्यांचे सुपुत्र आकाश व रोहित या बाप-बेट्यांनी एकत्र रक्तदान करून समाजात प्रेरणादायी उदाहरण सादर केले.
तसेच महिलांचा देखील उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. सुजाता लाडवंजारी व रूपाली चौधरी या दोघी भगिनींनी सामाजिक जबाबदारी निभावत रक्तदानात सहभाग घेतला.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मोनाली कामळसकर फाऊंडेशन, फ्रेंड सर्कल, गाथा फाऊंडेशन यांच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमस्थळी अनेक मान्यवरांनी हजेरी लावत विजय वाणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
मेहरूण येथील भागवत चंद्रकांत वाणी यांनी सर्व उपस्थितांसाठी लस्सी पॅकेटचे वाटप करून अतिथ्यशीलतेचा मनापासून प्रत्यय दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय नारायण वाणी, अजय पांडुरंग कामळस्कर, राजेश सुभाष वाणी, प्रकाश मुरलीधर वाणी, मुकुंदराव एकनाथ वाणी व वासुदेव तुकाराम वाणी यांनी मोलाचे सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा