Top News

जळगाव येथील सेंट टेरेसा महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा


शालेय विद्यालयाचा नवीन उपक्रम, रिक्षा चालकांच्या घरातील महिलांना शिलाई मशीनचे प्रशिक्षण

जळगाव, प्रतिनिधी I
सेंट टेरेसा महाविद्यालयात आज जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयातील महिला शिक्षिकांना शुभेच्छा कार्ड देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश महिलांच्या योगदानाची, कार्याची ओळख करून देणे असा होता.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापिका सिस्टर जुलीट, सिस्टर डेल्ला यांनी महिलांच्या कार्याबद्दल उपस्थितांना प्रेरणादायक मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांच्या महत्वाचे योगदान विविध क्षेत्रांमध्ये कसे अनमोल आहे यावर विचार मांडले.

त्याचवेळी, जळगाव शहरातील सेंट टेरेसा कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये देखील जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी, सर्व पुरुष शिक्षकांच्यावतीने महिला शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला. पुरुष शिक्षकांनी गीत सादर करत महिला शिक्षिकांना चॉकलेट, शुभेच्छा कार्ड देण्यात आले.

सेंट टेरेसा महाविद्यालयाचे मुख्याध्यापिका सिस्टर जुलीट, सिस्टर डेल्ला व महिला शिक्षिका यावेळी उपस्थित होत्या, त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. महिला शिक्षिकांच्या योगदानानेच शिक्षण क्षेत्राचा विकास होतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी सर्व महिला शिक्षिकांचा सन्मान करत त्यांच्या कष्टांचे महत्त्व मान्य करण्यात आले व त्यांना आगामी काळात अधिक प्रगतीची शुभेच्छा देण्यात आल्या. हा कार्यक्रम सेंट टेरेसा महाविद्यालयात एका सकारात्मक वातावरणात साजरा करण्यात आला. त्यात सर्व महिला शिक्षिकांच्या योगदानाची कदर करण्यात आली.

ऑटो रिक्षा चालकांच्या घरातील महिलांसाठी शिलाई मशीन प्रशिक्षण
शालेय विद्यालयात ऑटो रिक्षा चालकांच्या घरातील महिलांसाठी शिलाई मशीन चालविण्याचे प्रशिक्षण आजपासून सुरू करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना शिलाई यंत्र चालविण्याचे पूर्ण ज्ञान दिले जाणार आहे. यामुळे महिलांना घराच्या कामांबरोबरच शिलाई करून आर्थिक उत्पन्न मिळविण्याची संधी मिळणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने