Top News

महिला दिनानिमित्त नेत्रज्योती हॉस्पिटलतर्फे भव्य मोफत फेको शस्त्रक्रिया व नेत्र-दंत तपासणी शिबिर


जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I संत बाबा गुरुदासराम चॅरिटेबल ट्रस्ट संचलित नेत्रज्योती हॉस्पिटल, सिंधी कॉलनी, जळगाव येथे महिला दिनानिमित्त ८ मार्च २०२५ रोजी भव्य निशुल्क नेत्र तपासणी व दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९.३० ते सायं. ६.३० या वेळेत हे शिबिर संपन्न होणार आहे. तपासणीतून निवडलेल्या रुग्णांवर ८ मार्च २०२५ ते ३१ मार्च २०२५ दरम्यान मोफत फेको शस्त्रक्रिया (ऑक्रीरी फोल्ड लेन्ससह) करण्यात येणार आहे.

फक्त पात्र रुग्णांना लाभ
या शिबिराचा लाभ फक्त पिवळे कार्ड, केसरी कार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला असलेल्या गरजू रुग्णांनाच मिळणार आहे. मोतीबिंदू असलेल्या पात्र रुग्णांवर फेको लेन्स टाकून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाईल. तसेच पॅथॉलॉजिकल तपासणी मोफत केली जाणार आहे. हॉस्पिटलतर्फे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी मोफत राहण्याची व भोजनाची सोय देखील करण्यात आली आहे.

तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व मार्गदर्शन
या शिबिरात नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. शिरीष पाटील, डॉ. हीरा जोशी, डॉ. तुषार बोंबटकर आणि डॉ. रेवती महाजन हे रुग्णांची तपासणी करून योग्य उपचारांची शिफारस करतील. तसेच दंततपासणीसाठी डॉ. वर्षा रंगलानी, डॉ. निकिता मंधवाणी, डॉ. स्नेहल जाधव आणि डॉ. ईश्वरी देशमुख उपलब्ध असतील.

संस्थेचे आवाहन
संस्थेचे अध्यक्ष डॉ. गुरुमुख जगवानी, उपाध्यक्ष दिलीपकुमार मंधवाणी, सेक्रेटरी डॉ. मूलचंद उदासी आणि सर्व ट्रस्टींनी गरजू रुग्णांनी या मोफत शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने