Top News

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘गाथा फाउंडेशन’ची स्थापना


जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I शहरातील मेहरूण परिसरातील वाणी समाजाने गुढीपाडव्याच्या पावन पर्वावर ‘गाथा फाउंडेशन श्री काथार (कं) वाणी समाज, मेहरूण’ या संस्थेची स्थापना केली. आद्य संत श्री तुकाराम महाराज यांच्या ‘तुकाराम गाथा’ या पवित्र ग्रंथावरून संस्थेचे नाव ठरविण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून संस्थेच्या नावाबाबत परिसरातील नागरिकांमध्ये उत्सुकता होती. अखेर आठ दिवसांच्या चर्चेनंतर, गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘गाथा फाउंडेशन’ हे नाव निश्चित करण्यात आले. पाडव्याच्या सायंकाळी संपूर्ण मेहरूणकर एकत्र येत संस्थेची अधिकृत स्थापना करण्यात आली. यानिमित्ताने पारंपरिक पद्धतीने गुढी उभारून संस्थेच्या कार्याचा शुभारंभ करण्यात आला.

या संस्थेच्या माध्यमातून समाजहितासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. मेहरूण वाणी समाजाच्या या ऐतिहासिक पावलाबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने