Top News

कवयित्री बहिणाबाई महिला व सरदार वल्लभभाई पटेलबॉक्स क्रिकेट लीगचे उद्घाटन


लेवा पाटीदार प्रीमिअर लीगचा उपक्रम; ना.रक्षाताई खडसे यांनी भेट देऊन टीम ला शुभेच्छा दिल्यात, आज सायंकाळी होणार समारोप
जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I लेवा पाटीदार प्रीमिअर लीग आयोजित कवयित्री बहिणाबाई महिला बॉक्स क्रिकेट लीग, भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल पुरुष बॉक्स क्रिकेट लीग चे २८ ते ३० मार्च २०२५ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक २८ मार्च रोजी सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन झाले. महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण यावेळी होते. मॅचेसच्या दुसऱ्या दिवशी आज शनिवार दिनांक 29 मार्च रोजी या स्पर्धेच्या ब्रँड अँबेसिडर तथा केंद्रीय राज्यमंत्री नामदार रक्षाताई खडसे ह्यांनी भेट दिली असून महिलांचा उत्साह वाढविला. 

या स्पर्धेच्या उदघाटनाप्रसंगी आ. राजू मामा भोळे, महादेव हॉस्पिटल च्या संचालिका डॉ केतकी ताई पाटील, माजी महापौर सीमाताई भोळे, सिंधुताई कोल्हे, उज्वलाताई बेंडाळे, मनीषा खडके (भुसावळ), गायत्री राणे, स्वाती भोळे (भुसावळ), आशाताई कोल्हे, स्वप्नाली काळे, डॉ शिल्पा बेंडाळे, माधुरी अत्तरदे, सारिका फालक (भुसावळ), मेघा कुरकुरे (भुसावळ), जान्हवी पाटील, राधा कोल्हे, दीप्ती ढाके, हर्षाली चौधरी, गायत्री चौधरी, भावना धांडे, सारिका चौधरी, गायत्री महाजन, सुचिता चौधरी, डॉ रती महाजन, विद्या बेंडाळे, डॉ पूजा महाजन, कामिनी धांडे, एस एस पाटील, खुशबू राणे, युवराज रडे, मधुकर भंगाळे, अमित काळे, डॉ वैभव पाटील, निलेश चौधरी, चंदन कोल्हे, चेतन पाटील, डॉ.पंकज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनासह महाराष्ट्र गीताने कार्यक्रमास सुरवात झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते टॉस होऊन महिलांची बॉक्स क्रिकेट मॅच सुरु झाली. या स्पर्धेत पुरुष व महिला या दोन्ही गटासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि उत्तेजनार्थ अशे स्मृती चिन्ह दिले जाणार आहे. पहिल्यांदाच महिलांसाठी या प्रकारची बॉक्स क्रिकेट लीग आयोजित करण्यात आल्यामुळे सहभागी महिलांचा उत्साह वाखाण्याजोगा होता. आयोजकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आणि समाजातील भगिनींच्या भक्कम साथीमुळे आम्हाला खेळण्याची संधी मिळाली त्याबद्दल स्पर्धक महिलांकडून आभार मानले जात होते. उदघाटन समारंभाचे सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी केले.

या स्पर्धेसाठी गोदावरी फाऊंडेशन संचालित महादेव हॉस्पिटलच्या संचालिका डॉ केतकी ताई पाटील, आमदार राजूमामा भोळे, माजी महापौर ललित कोल्हे, एस व्ही पी एल सोलर चे संचालक हिमांशू इंगळे, डॉ पंकज पाटील, डॉ मनीष चौधरी, डॉ जितेंद्र ढाके, महेश चौधरी, दीपक पाटील, चेतन पाटील, सौ.दीप्ती ढाके, जयेश नारखेडे, डॉ वैभव पाटील, सोहम खडके, भूषण चौधरी, गौतम चौधरी, डॉ गौरव महाजन, निलेश चौधरी, हरीश कोल्हे, आशुतोष पाटील, तेजस रडे, योगेश खडके, जयेश भंगाळे, माधुरी अत्तरदे, सूचिता चौधरी, प्रीती महाजन, राधा कोल्हे, गायत्री राणे, पल्लवी चौधरी, पूजा महाजन, शर्वरी काळे, गायत्री महाजन, पूजा सरोदे, अमिता भंगाळे आदींचे सहकार्य लाभले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने