Top News

प्रभाग क्रमांक १३ मधील मोहाडी रोडवरील काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ


नगरसेविका ज्योती चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांची दीर्घकाळची मागणी असलेल्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त लागला आहे. मोहाडी रोड परिसरातील मराठा मटन हॉटेलच्या मागील भागातील रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन आज नगरसेविका ज्योती बाळासाहेब चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले.

या कार्यक्रमाला परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरसेविका ज्योती चव्हाण यांनी आपल्या प्रयत्नातून हा निधी उपलब्ध करून आणल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या वेळी नागरिकांनी नगरसेविकांचे आभार मानत या विकासकामाची प्रशंसा केली.

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना होत होती अडचण
मोहाडी रोड परिसरातील हा रस्ता अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत होता. पावसाळ्यात या ठिकाणी चिखल आणि खड्डे निर्माण होत असल्याने रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत होता. विशेषतः पादचाऱ्यांना आणि वाहनधारकांना याचा मोठा त्रास होत होता. या पार्श्वभूमीवर नगरसेविका ज्योती चव्हाण यांनी या रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी विशेष प्रयत्न केले आणि त्याला यश आले.

स्थानिकांनी व्यक्त केला आनंद
रस्त्याच्या कामास सुरुवात झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यावेळी उपस्थित नागरिकांनी "हा रस्ता मजबूत आणि टिकाऊ व्हावा" अशी अपेक्षा व्यक्त केली.

नगरसेविका ज्योती चव्हाण यांनी यापूर्वीही अनेक विकासकामे मार्गी लावली असून, प्रभाग क्रमांक १३ च्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने