२ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त, एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I कासोदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गांजा विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर पोलिसांनी एक मोठा सापळा रचला. गेल्या पाच दिवसांपासून पोलिसांनी गांजा तस्करांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी पोलीस पथकाने वनकोठे गावाजवळ एक संशयित आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपी मोटारसायकलवर प्लास्टिकच्या गोणीत गांजा घेऊन जात होता. पोलिसांनी तपासणी केली असता गोणीत १९ किलो गांजा सापडला. या कारवाईत पोलिसांनी गांजा आणि मोटारसायकल असा एकूण २,८०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपी म्हणून अजय रवींद्र पवार (वय २६, रा. सोनबर्डी, ता. एरंडोल) याला अटक करण्यात आली. त्याच्यावर एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिसांच्या या कार्यवाहीत स.पो.नि. निलेश राजपुत, पो.उ.नि. दत्तु खुळे, पो.हे.कॉ. नंदलाल परदेशी, पो.ना. अकील मुजावर, पो.ना. किरण गाडीलोहार, पो.ना. नरेंद्र गजरे, पो.कॉ. समाधान तोंडे, आणि पो.कॉ. लहू हटकर यांचा समावेश होता.
या गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. निलेश राजपुत करत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा