एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील गणेशपुरी भागात राहणाऱ्या एका तरुणाचे बंद घराच्या दरवाजाची कडी आतून उघडून घरातून २३ हजार ३०० रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना रविवारी सकाळी ६ वाजता घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहसीन खान अजमल खान (वय ३९, रा. गणेशपुरी, जळगाव) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. हा तरुण बेकरी चालवून आपला उदरनिर्वाह करतो. रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाची कडी आतून उघडून घरातून २३ हजार ३०० रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना सकाळी ६ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात मंगळवारी फिर्याद देण्यात आली आहे. त्यानुसार एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढी
ल तपास पोलिस उपनिरीक्षक अशोक काळे करीत आहेत.वरील माहितीवरून सविस्तरपणे बदल करून बातमी बनवून पाठवा
टिप्पणी पोस्ट करा