Top News

जळगावात तीन वर्षीय बालकाला सिंड्रोम 'जीबीएस'चा आजार


जिल्ह्यात आतापर्यंत तीन रुग्ण आढळले, जळगावात उपचार सुरु

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I
शहरातील रामेश्वर कॉलनी भागातील एका तीन वर्षीय बालकाला ग्युलन बरे सिंड्रोम (जीबीएस) आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील (जीएमसी) बालरोग विभाग अतिदक्षता वॉर्डात उपचार सुरू आहे. या आजाराचे जिल्ह्यात आतापर्यंत तीन रुग्ण आढळून आले असून, महिला रुग्णाला डिस्चार्ज सुरू दिला, तर रावेरच्या तरुणावर उपचार असून त्याची तब्येत सुधारत असल्याचे डॉ. पाराजी बाचेवर यांनी सांगितले.

या बालकाला गेल्या काही दिवसांपासून पायदुखीचा त्रास जाणवत असल्याने रक्त तपासणी केली असता जीबीएस आजार झाल्याचे निष्पन्न झाले.त्याच्यावर तत्काळ जीएमसीचे अधिष्ठाता गिरीश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग तज्ज्ञ डॉ. बाळासाहेब सुरोसे, डॉ. गिरीश राणे यांनी उपचार सुरू केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने