सिल्वर, ब्राँझ मेडलसह थायलंड स्पर्धेसाठी निवड
जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I गोवा येथील भारतीय युवा व्यवहार व क्रिडा मंत्रालय यूथ होस्टेल व रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने नॅशनल स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या स्केटिंग स्पर्धेत भुसावळ येथील तीर्थराज मंगेश पाटील याने दुसरा क्रमांक मिळवून आपला नाम शोअर केला आहे. या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांतील विद्यार्थी सहभागी झाले होते, त्यात गोवा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर राज्यांचा समावेश होता.
नॅशनल स्केटिंग रेस स्पर्धेत रिले मॅच आणि स्केटिंग रेस मध्ये अंडर 6 गटात तीर्थराज पाटील ने दुसरे स्थान पटकावले. त्याला या प्रावीण्यासाठी 1 सिल्वर मेडल आणि 1 ब्राँझ मेडल मिळाले. या यशामुळे त्याचे पुढील महिन्यात थायलंड येथे होणाऱ्या रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया इंटरनॅशनल स्पर्धेसाठी सिलेक्शन झाले आहे.
तीर्थराज पाटीलच्या निवडीबद्दल इंटरनॅशनल कोच श्री. भिकन अंबे सर यांनी त्याचे अभिनंदन केले. त्याच्या यशामध्ये सिल्वर लाईन स्पोर्ट्स अकॅडमी च्या कोचेस श्री. पियुष दाभाडे आणि श्री. दिपेश सोनार यांचा अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान आहे.
तीर्थराज, जो एन के नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूल चा 1A वर्गाचा विद्यार्थी आहे, त्याने नॅशनल स्पर्धेसाठी प्रॅक्टिस करत असताना शाळेतील शिक्षकांनी त्याला योग्य मार्गदर्शन केले. त्याचबरोबर, जय मातृभूमी क्रीडा मंडळ व संतोषीमाता बहुउद्देशीय हॉल यांच्या सहकार्याने त्याला स्केटिंगची प्रॅक्टिस करण्यासाठी उत्तम सुविधा मिळाली.
तीर्थराज पाटील हा मिल्ट्री इंजिनिअरिंग सर्विस चे सेवानिवृत्त कर्मचारी सुभाष पाटील यांचा नातू व भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा चिटणीस मंगेश पाटील यांचा मुलगा आहे.
या यशामुळे भुसावळ शहरात स्केटिंग क्रीडेशास्त्राची दखल घेतली जात आहे. भविष्यात त्याला आणखी मोठ्या स्पर्धांमध्ये सफलता मिळवण्याची अपेक्षा आहे.
टिप्पणी पोस्ट करा