जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव सी. ए. शाखेची सन २०२५-२६ची नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून, अध्यक्षपदी सीए हितेश आगीवाल यांची निवड करण्यात आली.
जळगाव सी.ए. शाखेचा पद यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव
नुकत्याच झालेल्या सी. ए. परीक्षेमध्ये उत्तीर्ण ३४ नवीन सी. ए. तसेच सी. ए. इंटरमिजीएट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांचा तसेच जळगाव बॉक्स क्रिकेट लीग २०२४ मध्ये विजेत्या झालेल्या गटांचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन शिल्पा सेठिया व यश जैन यांनी केले, तर सोहन नेहेते आभार मानले.
हस्तांतरण सोहळा आयसीएआय भवन नूतन कार्यकारिणी
येथे शनिवारी (दि. २२ फेब्रुवारी) उत्साहात पार पडला. मावळते अध्यक्ष अभिषेक कोठारी यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष हितेश आगीवाल यांच्याकडे पदभार सोपविला. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय परिषद सदस्य पीयूष छाजेड, उमेश शर्मा, पीयूष चांडक उपस्थित होते.
नूतन कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष म्हणून हितेश आगीवाल यांच्यासह उपाध्यक्ष व विद्यार्थी शाखा अध्यक्ष रोशन रुणवाल, सचिव सोहन नेहेते, कोषाध्यक्ष लक्ष्मीकांत लाहोटी, व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून पद्मनाभ काबरा, नचिकेत जाखेटिया, सहकारी सदस्य म्हणून तृप्ती राठी, हितेश जैन यांची निवड करण्यात आली.
हितेश आगीवाल यांच्याकडे अध्यक्षपदाचे सूत्रे सोपविताना अभिषेक कोठारी.
टिप्पणी पोस्ट करा