जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I सेंट लॉरेन्स शाळेजवळील संचार नगर येथे एका सरकारी अधिकाऱ्याची कार अज्ञात व्यक्तीने फोडल्याची घटना १४ फेब्रुवारी रोजी रात्री घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
वरील घटना वरिष्ठ हिंदी अनुवादक डॉ. परेश सनान्से यांच्या मालकीच्या टाटा टिगॉर (एमएच १९ ई ए ११९) या कारची आहे. अज्ञात व्यक्तीने कारच्या समोरच्या मोठ्या काचेवर लोखंडी वस्तु आणि दगडाचा वापर करून फेकून ती फोडली. याच प्रकाराची घटना मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात देखील घडली होती, ज्यामध्ये कारच्या काचेचे नुकसान झाले होते.
याची विशेष बाब अशी की, गेल्या तीन महिन्यांत एकाच कारच्या समोरच्या काचेला दोन वेळा फोडले गेले असून त्याचा एकूण नुकसानीचा अंदाज रु. १० हजार रुपये आहे. काचेची फोडी एक विशिष्ट पद्धतीने केली गेली आहे, ज्यामुळे ही घटना संदिग्ध बनली आहे.
तत्पूर्वी एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. ईश्वर लोखंडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून लवकरच तपास सुरू करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा