जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जगप्रसिद्ध फ्रीस्टाईल फुटबॉल पटू जिमी नाईट यांनी पोदार स्कूलमध्ये भेट देऊन विद्यार्थ्यांना अत्यंत प्रेरणादायक प्रशिक्षण दिले. विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमासोबतच मैदानी खेळांच्या महत्त्वाचे महत्त्व सांगताना, जेमी नाईट यांनी त्यांच्या फ्रीस्टाईल फुटबॉल कौशल्याचा अद्भुत प्रदर्शन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पोदार स्कूलचे प्राचार्य गोकुळ महाजन यांनी जेमी नाईट यांचे पुष्पगुच्ह देवून स्वागत केले. शाळेच्या समन्वयिका अंकिता मुंदडा यांनी विद्यार्थ्यांना जेमी नाईट यांचा परिचय करून दिला.
यावेळी जेमी नाईट यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत, "योग्य मार्गदर्शन, शिस्तबद्ध सराव आणि नियमित प्रयत्नांद्वारे आपण कोणत्याही क्रीडाप्रकारात यश संपादन करू शकता" असे मोलाचे विचार विद्यार्थ्यांना दिले. ते पुढे म्हणाले, "समाजात खिलाडू वृत्ती महत्त्वाची असते आणि ती जोपासली जावी." यामुळे उपस्थित विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले.
सत्रात जेमी नाईट यांनी आपल्या चमकदार फ्रीस्टाईल फुटबॉल कौशल्याने विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी सुलभ युक्त्या आणि तंत्रज्ञान शिकवून सत्र अधिक मनोरंजक व माहितीपूर्ण बनवले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला आणि जेमी नाईटला अनेक प्रश्न विचारले. याशिवाय, विद्यार्थ्यांनी त्यांना मजेदार आव्हाने देखील दिली, जी त्यांनी मोठ्या उत्साहाने पूर्ण केली.
विशेष प्रशिक्षण सत्रात, जेमी नाईट यांनी विद्यार्थ्यांना फुटबॉल संतुलनासाठी काही महत्त्वाच्या युक्त्या शिकवल्या. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये फुटबॉल खेळासोबतच खेळाच्या गंभीरतेबाबत नवीन उत्साह निर्माण झाला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शालेय कर्मचार्यांनी कठोर परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली, ज्यामुळे हे सत्र प्रत्येकासाठी संस्मरणीय ठरले.
जेमी नाईटच्या प्रेरणादायक मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये फुटबॉल खेळाविषयी नवा उत्साह निर्माण झाला, आणि यामुळे खेळाच्या क्षेत्रात त्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल होईल.
टिप्पणी पोस्ट करा