Top News

धक्कादायक : पाणी आणताना विजेचा धक्का लागून १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील छत्रपती शिवाजीनगर भागातील हुडको परिसरात २० फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. सोनल सुरेश बाविस्कर (वय १४, रा. शिवाजीनगर हुडको) या मुलीला पाणी आणताना पाण्याच्या मोटारीमुळे विजेचा धक्का लागला, आणि त्या ठिकाणी तिचा मृत्यू झाला.

सोनल आपल्या कुटुंबीयांसह राहत होती, ज्यात वडील, आजी, आजोबा, लहान भाऊ व बहीण यांचा समावेश होता. गुरुवारी संध्याकाळी नळाला पाणी आले होते. त्यासाठी पाण्याची मोटर चालू केली होती, त्यावेळी सोनलचा हात मोटरला लागला. मोटरमधून विद्युत प्रवाह वाहत होता, आणि त्यामुळे तिला विजेचा धक्का लागला, आणि ती जागीच फेकली गेली.

आजूबाजूच्या नागरिकांनी तिला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी नेले, परंतु तिथे डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे सोनलच्या कुटुंबीयांमध्ये एकच हंबरडा माजला आहे.

शिवाजीनगर परिसरातील नागरिकांनी आणि नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. मुलीच्या अचानक मृत्यूमुळे परिसरात शोकाचे वातावरण आहे.

जळगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी रुग्णालयात येऊन मृताच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने