रेल्वेत चढताना पाय घसरून खाली पडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबात शोककळा
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I पिंप्राळा परिसरातील दांडेकर नगरातील २० वर्षीय चेतन उर्फ जय दिनेश पाटील याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. हा अपघात पुणे येथील मंगळवारी सायंकाळी घडला. चेतन पाटील हे रेमंड कंपनीतील दिनेश रामभाऊ पाटील यांचे पुत्र होते. त्याच्या कुटुंबात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे.
चेतन पुणे येथील एका कंपनीत नुकतेच नोकरीला लागला होता. मंगळवारी सायंकाळी तो रेल्वे चढताना पाय घसरून खाली पडला. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. रेल्वे पोलिसांनी त्याच्याकडील मोबाईल क्रमांकावरून चेतनच्या मामाला घटनेची माहिती दिली, आणि नंतर परिवाराला अपघाताची माहिती दिली.
बुधवारी दुपारी त्याचा मृतदेह जळगावात आणला गेला. त्यावेळी त्याच्या कुटुंबियांनी हंबरडा फोडला. घटनास्थळावर दु:ख आणि शोक व्यक्त केला गेला. पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा