Top News

खळबळजनक : वाळूच्या टिप्पर खाली येऊन पाच मजुरांचा जागीच मृत्यू



वाळूच्या टिप्परखाली दबून मजुरांचा मृत्यू, स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप, कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपायांची गाफीलपणा आणि कठोर कारवाईची मागणी

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जालना :
जाफराबाद तालुक्यातील पासोडी-चांडोळ रोडवर पुलाच्या कामासाठी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये वाळूच्या टिप्पर खाली येऊन पाच मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी दुर्घटना घडली.

सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथील मजूर येथे पुलाच्या उभारणीसाठी काम करत होते. कामाच्या ठिकाणी मजूरपत्र्याच्या शेडमध्ये राहून आपल्या कार्याची तयारी करत होते. संध्याकाळी सर्व मजूर जेवण करून आराम करण्यासाठी शेडमध्ये झोपले होते. त्याचवेळी रात्री साडेतीन वाजता एक टिप्पर वाळू घेऊन शेडच्या जवळ आला.

वाळूची अवैध वाहतूक करत असताना टिप्पर चालक घाईगडबडीत वाळूची ट्रक पलटी शेडवरच केली. परिणामी, वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून पाच मजुरांचा जागीच मृत्यू झाला. शेडमध्ये एकूण सात मजूर झोपले होते, त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण बचावले.

घटनास्थळी पोलिस तातडीने पोहोचले आणि तपास सुरू केला. टिप्पर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे, आणि त्याच्या शोधासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. स्थानिक नागरिकांमध्ये या दुर्घटनेनंतर प्रचंड संताप व्यक्त होत आहे. कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचे पालन करण्यात गाफीलपणा झाला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.  

दुर्दैवी घटनेमुळे संबंधित मजुरांच्या कुटुंबीयांवर गहिरा शोक पडला असून, प्रशासनाने या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. या घटनेने कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपायांची गंभीर विचारणा केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने