Top News

सेवानिवृत्त शिक्षकाच्या बंद घरातून चोरी; स्थानिक गुन्हे शाखेने ४८ तासांत आरोपी गजाआड



जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I गुजराल पेट्रोलपंप परिसरातील निवृत्ती नगरातील संकल्पसिद्धी अपार्टमेंटमधील एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या बंद घरातून १८ फेब्रुवारी रोजी चोरी घडली होती. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ४८ तासांच्या आत, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपीला ताब्यात घेऊन चोरीला गेलेला माल हस्तगत केला.

सेवानिवृत्त शिक्षक अनिल लक्ष्मण सपकाळे हे त्यांच्या आईला भेटण्यासाठी गेले होते. याच दरम्यान, चोरट्यांनी अपार्टमेंटमधील बंद घराचे कुलूप तोडून ५० हजार रुपये रोख रक्कम आणि १ ग्रॅम सोन्याची अंगठी चोरून नेली. तपासादरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना सचिन भागवत सपकाळ (राह. मोहाडी, ता. जामनेर) याने ही चोरी केल्याची माहिती मिळाली.

सचिनला ताब्यात घेऊन, त्याच्याकडून अधिक तपास केला असता, त्याने आपल्या ३ साथीदारांसोबत चोरी केल्याची कबुली दिली. याप्रकारे पोलिसांनी त्याच्याकडून ५० हजार रुपयांची रोख रक्कम व १ ग्रॅम सोन्याची अंगठी हस्तगत केली आहे. या कारवाईत पोलिस उपनिरक्षक दत्तात्रय पोटे, विजयसिंग पाटील, अतुल वंजारी, अकरम शेख, महेश महाजन, प्रविण भालेराव, राहुल पाटील, भारत पाटील आणि महेश सोमवंशी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने