जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I 31 जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास भुसावळ येथील नवीन बस स्थानकावर घडलेल्या चोरीच्या घटनेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या खिशातून २० हजार रुपयांची रोकड चोरीला गेली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची सविस्तर माहिती अशी की, कांचन नगर शनिपेठ परिसरात राहणारे 64 वर्षीय सेवानिवृत्त कर्मचारी अनिल हजारी घेंगट हे जळगाव येथील नवीन बस स्थानकावर भुसावळ ते नाशिक या बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्याकडून २० हजार रुपयांची रोकड चोरली. अनिल घेंगट यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली असून त्यांच्यावतीने फिर्याद अर्ज दाखल करण्यात आला आहे.
घटनेची तपासणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल रवींद्र ठाकरे करत आहेत. अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासायला सुरुवात केली आहे.
पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे, तसेच चोरी करणाऱ्याच्या शोधासाठी चांगले प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली आहे.
टिप्पणी पोस्ट करा