राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देवाकडे साकडे घालून आदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा विकास अविरत राहो, अशी केली प्रार्थना
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I रायगड जिल्ह्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांचे पाच वर्षांपासून अविरतपणे सेवा कार्य सुरु आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्याचा विकास झपाट्याने होत आहे. त्यांचा कार्यकाळ यशस्वी होण्यासाठी आणि त्यांनी नवनवीन योजना आणि प्रकल्पांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्याच्या विकासाला चालना दिली आहे.
याचाच उद्देश साधून, देशातील मूर्ती स्वरूपातील आणि महाराष्ट्रातील एकमेव श्री क्षेत्र मंगळ ग्रह येथील देवस्थानावर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अभिलाषा रोकडे, जळगाव जिल्हा युवती अध्यक्ष मोनालिका पवार, विद्यार्थी सरचिटणीस अभिजीत देवरे, सहकारी कुणाल काळे आणि सोनू हिरे यांच्या पथकाने एकत्रितपणे मंगळ ग्रहावर अभिषेक करून, देवाकडे साकडे घालून आदिती तटकरे यांच्या हातून रायगड जिल्ह्याची सेवा अविरत सुरू राहो, अशी प्रार्थना केली.
यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी देवाच्या आशीर्वादाची मागणी केली. तसेच, आगामी काळात मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यात आणखी सफलता आणि रायगड जिल्ह्याचे सर्वांगीण विकास होईल, अशी आशा व्यक्त केली.
अभिषेकानंतर उपस्थितांनी श्री मंगळ ग्रहाचे दर्शन घेतले आणि कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा