Top News

Breaking I शाळेच्या इन्स्पेक्शनमध्ये चांगला शेरा द्यावा म्हणून घेतली मुख्याध्यापकासह अधिकाऱ्याने लाच

पिंपळकोठा येथील प्राथमिक शाळेतील इन्स्पेक्शन दरम्यान १० हजार रुपयांची लाच मागितली; लाचलुचपत विभागाने कारवाई केली

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथील प्राथमिक शाळेत इन्स्पेक्शन करत असताना शाळेच्या मुख्याध्यापकाने लाच घेतल्याची घटना समोर आली आहे. पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी यांनी शाळेच्या इन्स्पेक्शन मध्ये चांगला शेरा द्यावा म्हणून मुख्याध्यापक बळीराम सुभाष सोनवणे यांनी प्रत्येक शिक्षकाकडून १ हजार रुपये अशी एकूण १० हजार रुपयांची लाच मागितली होती.

तक्रारदार शिक्षकांनी या प्रकरणाची माहिती जळगाव लाचलुचपत विभागाला दिली आणि यावर विभागाने सापळा रचून कारवाई केली. सोमवारी तक्रारदार शिक्षकांनी १ हजार रुपये मुख्याध्यापकांना देताच लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. मुख्याध्यापक सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या कारवाईत एरंडोल पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी जे.डी. पाटील यांची फोनद्वारे पडताळणी केली असता त्यांनी २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली असल्याचे सांगितले, मात्र त्यांनी विरोध दर्शवला नाही. या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई पोलीस उपाधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली केली. पथकात सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, पोलीस नाईक बाळू मराठे, पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने यांचा समावेश होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने