सागर पार्क जळगाव येथे २३ ते २७ जानेवारी दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, २६० महिला बचत गटांची भागीदारी
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव भरारी फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या ५ दिवसीय बहिणाबाई महोत्सवाचे भूमीपूजन सोमवारी सायंकाळी सागर पार्क जळगाव येथे के.के. कॅन्सचे संचालक रजनीकांत कोठारी यांच्या हस्ते पार पडले. यंदाच्या महोत्सवाच्या १०व्या वर्षानिमित्त कोठारी यांनी या महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.
भूमीपूजनाच्या कार्यक्रमात सॅटर्डे क्लबचे व्ही. पी. कुलकर्णी, जयेश पाटील, दीपक पाटील, दिनेश थोरात, शैला चौधरी, गायत्री परदेशी, जयश्री ढगे, सुनंदा मोझे, अर्चना जाधव, चित्रा चौधरी, विनोद ढगे, सचिन महाजन, मोहित पाटील, अक्षय सोनवणे, रितेश लिमडा, अभिषेक बोरसे, दीपक जोशी, नंदकिशोर बारी, कृष्णा चव्हाण आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
दीपक परदेशी, फाउंडेशनचे अध्यक्ष, यांनी महोत्सवाच्या तयारीबद्दल माहिती दिली. या महोत्सवात खान्देशातील खाद्य परंपरा आणि सांस्कृतिक चळवळीला चालना देणारे विविध कार्यक्रम होणार आहेत. विशेषत: बहिणाबाई महोत्सवात भारुड, लावणी तसेच मराठी संस्कृतीचा फॅशन शो यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहेत. याशिवाय २६० महिला बचत गटांनी महोत्सवात स्टॉल्स राखीव केले आहेत.
महोत्सवात महिलांसाठी खास कार्यक्रमांची योजना केली असून, खेळ, पैठणी सादरीकरण, रांगोळी स्पर्धा तसेच शाळा व महाविद्यालयीन ६५० कलावंतांचे प्रदर्शन होणार आहे. महोत्सव २३ ते २७ जानेवारी दरम्यान खुला असेल आणि त्यामध्ये विविध सांस्कृतिक आणि मनोरंजन कार्यक्रम आयोजित केले जातील.
यंदा महोत्सवाचे आयोजन मोठ्या प्रमाणावर करण्यात आले असून, येणाऱ्या ५ दिवसांमध्ये विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे जळगाववासीयांना एक अनोखा अनुभव मिळणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा