Top News

राज्यातील नाशिक व रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, महायुतीमध्ये तणाव

शिवसेना, भाजपमध्ये पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच, दादा भुसे, अदिती तटकरे यांच्या निवडीवर नाराजी

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I
राज्यातील महायुती सरकारच्या मंत्र्यांची पालकमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर शिंदे गटातील काही मंत्र्यांना पालकमंत्री पद न मिळाल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची लाट होती. याच पार्श्वभूमीवर नाशिक आणि रायगड जिल्ह्यांतील पालकमंत्रीपदांना स्थगिती देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य सरकारकडून समोर आली आहे.

रायगडमध्ये पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरू आहे. अदिती तटकरे यांच्या नामनिर्देशनानंतर शिवसेनेकडून विरोध व्यक्त करण्यात आला. महाड विधानसभा संघातील सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आणि मुंबई-गोवा महामार्गावर शिवसैनिकांनी टायर जाळून निषेध केला. याचप्रमाणे नाशिकमध्येही पालकमंत्रीपदावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपचे गिरीश महाजन यांना देण्यात आले, तर दादा भुसे यांना डावलल्याने शिवसेनेतील कार्यकर्ते नाराज आहेत.

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळाले नाही, आणि त्यांना पुन्हा एकदा हे पद मिळवण्याची आशा होती. मात्र, नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांचा नामनिर्देशन झाल्यामुळे दादा भुसेही नाराज झाले आहेत. यामुळे रायगड आणि नाशिक जिल्ह्यांतील महायुतीतील वाद सार्वजनिक होण्याच्या शक्यतेमुळे दोन्ही जिल्ह्यांतील पालकमंत्रीपदांना स्थगिती देण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाकडून घेण्यात आला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने