भुसावळ तालुक्यातील सुसरी शिवारातील घटना, वरणगाव पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I भुसावळ तालुक्यातील सुसरी शिवारात असलेल्या राखेच्या ठेक्यावर २४ जानेवारी रोजी रात्री १०.३० वाजता दोन जणांनी सुपरवायझर आसिफ शब्बीर तडवी यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून त्यांचा मोबाईल फोडला आणि खिशातील ४ हजार २०० रुपये जबरदस्तीने काढले. या घटनेमुळे तडवी जखमी झाले असून त्यांना वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सुसरी शिवारात असलेल्या आसरामाता मंदिराजवळ राखेचा ठेका असिफ तडवी या २४ वर्षीय युवकाला सुपरवायझर म्हणून काम करत होते. २४ जानेवारीच्या रात्री ते ड्युटीवर असताना करण बेलदार आणि नितीन बेलदार हे दोघे वेल्हाळा येथून आले आणि सुरुवातीला तडवी यांना शिवीगाळ केली. त्यानंतर करण बेलदारने लोखंडी रॉडने तडवी यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या मोबाईलला फेकून तोडले. नंतर तडवी यांच्याकडून ४ हजार २०० रुपये जबरदस्तीने काढून त्यांना धमकी दिली.
तडवी यांच्या जबाबानुसार वरणगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी (३० जानेवारी) सायंकाळी ७ वाजता करण बेलदार आणि नितीन बेलदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरणगाव पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्धन खंडेराव या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा