Top News

जळगाव शहरात मनपा गेटसमोर दुचाकी चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव शहर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील मनपा गेटसमोर 26 जानेवारी 2025 रोजी रात्री दुचाकी चोरीची घटना घडली. घटना समोर आल्यानंतर, 27 जानेवारी रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एजाजखान मौलादाद खान पठाण (30, रा. मुस्लीमवाडा पिंप्राळा) हे स्टॅम्पवेंडर आहेत. ते 26 जानेवारी रोजी आपल्या कामानिमित्ताने आपल्या मालकीच्या स्प्लेंडर प्रो. दुचाकी (एम.एच.19 बी.एल.1631) ने जळगाव शहरात आले होते. मनपा गेटसमोर गाडी पार्क करून ते काही वेळाने निघून गेले. मात्र, त्याच्या अनुपस्थितीत चोरट्यांनी त्या दुचाकीला लांबवले.

या घटनेनंतर एजाजखान यांनी 27 जानेवारी रोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली, त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

दुचाकी चोरीच्या या प्रकरणात पोलीस तांत्रिक तपास तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चोरट्यांचा शोध घेत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर, नागरिकांना इतर चोरीच्या घटनांविषयी सतर्क राहण्याची, आपली वाहने सुरक्षित ठेवण्याची आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने