शनिपेठ पोलिसांनी मध्यरात्रीच्या वेळीस केली कारवाई; दोघांकडून गावठी पिस्तुल, काडतूस व तलवार जप्त
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I नवीन वर्षाचे स्वागत करत असताना शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने मध्यरात्री अडीच वाजता गावठी पिस्तुल आणि धारदार तलवारसह मामा-भाच्यांना अटक केली आहे. हि कारवाई शनिपेठ परिसरात करण्यात आली असून, पोलिसांनी त्यांच्याकडून गावठी पिस्तुल, दोन जीवंत काडतूस आणि एक धारदार तलवार जप्त केली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे गुन्हे शोध पथक शहरातील पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी १ जानेवारी रोजी मध्यरात्री अडीच वाजता रेकॉर्डवरील संशयित शाम साहेबराव सपकाळे (वय ३०, रा. असोदा रोड) गावठी पिस्तुल घेऊन दहशत माजवताना दिसून आला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याच्याकडून गावठी पिस्तुल आणि दोन जीवंत काडतूस जप्त केले.
शाम साहेबराव सपकाळे याच्यावर अधिक तपास सुरू असतानाच, त्याचा भाचा विशाल उर्फ सोनू धनराज सोनवणे (वय २०, रा. असोदा रोड) हाही संशयित ठरला. त्याच्या कडेही एक धारदार तलवार जप्त करण्यात आली.
या दोघांविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक योगेश ढिकले तपास करत आहेत.
नवीन वर्षाच्या पहिल्या रात्री कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्याला पेट्रोलिंगसह नाकाबंदी करण्याच्या सूचनाही पोलिस अधीक्षकांनी दिल्या होत्या.
टिप्पणी पोस्ट करा