Top News

जळगाव शहर महानगरपालिकेच्यावतीने 'खान्देश महोत्सव 2025' चे आयोजन


महिला बचत गटांना प्रोत्साहन देणारा आणि खान्देशच्या कला व संस्कृतीला मानाचा मुजरा करणारा महोत्सव 3 ते 7 जानेवारी दरम्यान होणार

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहर महानगरपालिकेच्या वतीने 'खान्देश महोत्सव 2025' चे आयोजन 3 ते 7 जानेवारी 2025 दरम्यान बॅरिस्टर निकम चौक, सागर पार्क येथे करण्यात आले आहे. हा महोत्सव महिला बचत गटांना आणि इतर उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने तसेच खान्देशच्या स्थानिक कला, संस्कृती, परंपरा व कलागुणांना महत्त्व देण्यासाठी आयोजित केला जात आहे.

महोत्सवाचे उद्घाटन 3 जानेवारी रोजी सायं. 6.00 वाजता केंद्रीय राज्यमंत्री क्रीडा व युवक कल्याण विभाग रक्षा खडसे यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, प्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट अभिनेत्री ऋतुजा शिंदे यांची सिलेब्रेटी म्हणून विशेष उपस्थिती असणार आहे.

या महोत्सवात महिला बचत गटांचे उत्पादने, नामांकित ब्रँड्सचे स्टॉल्स, 'माझी वसुंधरा' विभाग, फॅशन झोन, विंटर झोन, किड्स झोन आणि विविध खाद्य स्टॉल्स देखील असतील. महोत्सवाचे आयोजन स. 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत होईल. सर्व वयोगटासाठी विविध आकर्षक कार्यक्रम व प्रदर्शनांचा अनुभव घेता येईल.

जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे व अधिकाऱ्यांच्या वतीने सर्व नागरिकांना सहकुटुंब या महोत्सवाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने