प्रदर्शनात १२५ शाळांमधील ११९ प्रकल्प सादर
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने जळगाव शहरातील सेंट टेरेसा कॉन्व्हेंट इंग्लिश मिडीयम महाविद्यालयात ५२ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप आज झाला. या प्रदर्शनात १२५ शाळांमधील विद्यार्थ्यांनी ११९ प्रकल्प सादर केले. यावेळी १३ उत्कृष्ट प्रकल्पांची राज्यस्तरावर सहभागी होण्यासाठी निवड करण्यात आली.
समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण होत्या. यावेळी उपशिक्षणाधिकारी रागिणी चव्हाण, एजाज शेख, सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघाचे राज्याध्यक्ष जे के पाटील, माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक रवींद्र चव्हाण, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सपकाळे, जळगाव जिल्हा अध्यापक मंडळाचे अध्यक्ष किशोर राजे, सचिव सुनील वानखेडे, मुख्याध्यापिका सिस्टर जुलीट आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून डॉ. पी एस कोळी, प्रा. दयाघन राणे, प्रा. आर बी देशमुख, प्रा. एस आर चौधरी, प्रा. सुमित काबरे, अविनाश मोरे, प्रशांत महाजन यांचे योगदान होते.
प्रदर्शनाचा निकाल:
उच्च प्राथमिक गट:
- प्रथम – पार्थ जाधव (पंकज विद्यालय, चोपडा)
- द्वितीय – गीतेश विकास निकम (साने गुरुजी विद्यालय, अमळनेर)
- तृतीय – गौरव नारखेडे (जी जे राजपूत स्कूल, वरखेड)
- उत्तेजनार्थ – मनीष माळी (महात्मा गांधी विद्यालय, वरणगाव)
माध्यमिक व उच्च माध्यमिक गट:
- प्रथम – आदित्य पाटील (आर टी काबरे विद्यालय, एरंडोल)
- द्वितीय – हितेश पाटील (छत्रपती शिवाजी हायस्कुल, चोपडा)
- तृतीय – अनुज बडगुजर (ग्रामविकास विद्यालय, पिंपळगाव)
- उत्तेजनार्थ – साक्षी तळेले (डॉ. दिवाकर खंडू चौधरी विद्यालय, डांभुर्णी)
उच्च प्राथमिक आदिवासी गट:
- प्रथम – निलेश बारेला (अनुदानित आदिवासी आश्रमशाळा, हातेड)
- उत्तेजनार्थ – भावना पावरा (शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, वाघझिरा)
माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी गट:
- प्रथम – भारती तडवी (रा. य. चव्हाण आश्रमशाळा, हातेड)
- उत्तेजनार्थ – अल्विरा तडवी (शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, वाघझिरा)
प्राथमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य गट:
- प्रथम – स्वाती बडगुजर (जि. प. प्राथमिक शाळा, पिंप्राळा)
- उत्तेजनार्थ – ज्योती राणे (जि. प. उच्च प्राथमिक कन्या शाळा, पाळधी)
माध्यमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य गट:
- प्रथम – प्रमोद सरोदे (श्री कृष्ण माध्यमिक विद्यालय, शेंदुर्णी)
- उत्तेजनार्थ – सुशांत प्रभाकर जगताप (सर्वोदय माध्यमिक विद्यालय, गुढे)
प्रयोग शाळा सहाय्यक परिचर गट:
- प्रथम – सुनील गंगाराम पाटील (नुतन माध्यमिक विद्यालय, चुंचाळे)
- उत्तेजनार्थ – धनंजय प्रकाश शेवाळे (सर्वज्ञ माध्यमिक विद्यालय, बोरगाव बु.)
उच्च प्राथमिक दिव्यांग विद्यार्थी गट:
प्रथम – वेदिका राजेंद्र मोरे (साधना माध्यमिक विद्यालय, कासोदा)
उच्च माध्यमिक दिव्यांग विद्यार्थी गट:
- प्रथम – अक्षय राजू परदेशी (सरदार एस के पवार विद्यालय, नगरदेवळा)
या यशस्वी विज्ञान प्रदर्शनासाठी सेंट टेरेसा हायस्कुलचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांची विशेष प्रशंसा करण्यात आली. सूत्रसंचालन वनिता अग्रवाल यांनी केले तर आभार एजाज शेख यांनी मानले. याप्रदर्शनात निवडलेले १३ प्रकल्प राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात भाग घेण्यासाठी मार्गदर्शित होणार आहेत.
टिप्पणी पोस्ट करा