Top News

Big Breaking I पिंप्राळा हुडको परिसरात जुन्या वादातून २६ वर्षीय तरुणाचा खून, सात जण गंभीर जखमी

चॉपर, कोयता, चाकू आणि व काठीने शिरसाठ कुटुंबावर हल्ला, नातेवाईकांचा महाविद्यालयात आक्रोश, पोलिसांचा घटनास्थळी तगडा बंदोबस्त

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात रविवारी सकाळी १९ जानेवारी रोजी जुन्या वादातून एक धक्कादायक घटना घडली. सात ते आठ जणांनी चॉपर, कोयता, चाकू आणि लाकडी काठी वापरून शिरसाठ कुटुंबावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात २६ वर्षीय मुकेश रमेश शिरसाठ याचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबातील सात जण गंभीरपणे जखमी झाले आहेत. 

जखमींमध्ये निळकंठ सुखदेव शिरसाठ (४५), कोमल निळकंठ शिरसाठ (२५), ललिता निळकंठ शिरसाठ (३०), सनी निळकंठ शिरसाठ (२१) यांचा समावेश आहे.

घटना समजताच रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जखमींवर उपचार सुरू असताना त्यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांच्यात आक्रोश दिसून आला.

या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात आले असून, पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त वाढवला आहे. रामानंदनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या घटनेमुळे पिंप्राळा हुडको परिसरात खळबळ उडाली असून, याविषयी अधिक तपास सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने