Top News

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून गावठी कट्ट्यासह दोघांना अटक



जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे भडगाव तालुक्यातील भडगाव गावात छापा टाकून दोन संशयितांना गावठी कट्टा (पिस्तुल) सह अटक केली आहे. आकाश झुंबर कांबळे (वय २४, रा. वरची बर्डी, यशवंतनगर, भडगाव) आणि शुभम भास्कर दौणे (वय २२, रा. रेल्वे स्टेशन जवळ कजगाव, ता. भडगाव) यांच्याकडून एक गावठी कट्टा जप्त करण्यात आले आहे.  

मिळालेल्या माहितीप्रमाणे, आकाश झुंबर कांबळे हा दहशत माजविण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा बाळगून फिरत होता. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी तत्काळ कारवाई केली आणि आकाशला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर शुभम भास्कर दौणे यालाही अटक करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही संशयितांविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.  

या कारवाईमध्ये जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका पार पाडली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, प्रविण भालेराव, महेश पाटील, ईश्वर पाटील, सागर पाटील आणि दिपक चौधरी यांचा समावेश होता.  

या कार्यवाहीसाठी जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंग चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी कारवाई केली आहे.  

पोलिसांनी या कारवाईतून जळगाव जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने