Top News

तालुकास्तरीय शासकीय कर्मचारी खेळांत बुद्धिबळ व कॅरम स्पर्धेत आरोग्य विभागाचे वर्चस्व


चोपड्यात शासकीय कर्मचारी खेळांच्या स्पर्धेत आरोग्य विभागाने साधला मोठा यश, बुद्धिबळ, कॅरम व धावण्याच्या स्पर्धांमध्ये होवून ठरले विजेते

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शासकीय कर्मचारी खेळांचे आयोजन आज महात्मा गांधी कॉलेज चोपडा व ऑक्सफर्ड इंग्रजी माध्यमिक विद्यालयातील क्रीडांगणात करण्यात आले. या खेळांचा शुभारंभ तालुका शिक्षण अधिकारी श्रीमती कविता सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आला.

आजच्या खेळात आरोग्य विभागाने आपला दबदबा सिद्ध केला. प्राथमिक आरोग्य केंद्र- अडावद येथील आरोग्य सेवक श्री. संतोष विष्णू भांडवलकर यांनी बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. प्राथमिक आरोग्य केंद्र-चहार्डी येथील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्रीमती रिना माळी यांनी १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत महिलांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. याशिवाय, प्राथमिक आरोग्य केंद्र-वैजापूर येथील डाटा ऑपरेटर श्री. निलेश सोनवणे यांनी कॅरम स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला.

विजेत्या कर्मचारी खेळाडूंना जळगाव येथील पंच व बुद्धिबळाचे आरबीटर श्री. संजय पाटिल, ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलचे क्रीडा शिक्षक व कॅरम पंच श्री. भुषण गुजर, मुस्तफा अँग्लो हायस्कूलचे क्रीडा शिक्षक श्री. शोएबखान, बॅटमिंटन प्रशिक्षक श्री. अमित डुडवे, श्रीमती क्रांती मॅडम, गट शिक्षण अधिकारी श्रीमती कविता सुर्वे यांच्यासह अन्य प्रमुख व्यक्तींनी पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

विविध शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी, तसेच पंचायत समितीचे कर्मचारी, केंद्र प्रमुख व शिक्षक वर्ग यांचाही या कार्यक्रमात उत्साहवर्धक सहभाग होता.

उद्या, ५ जानेवारी २०२५ रोजी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने