Top News

पत्रकार दिनानिमित्त जळगाव जिल्ह्यात दर्पणकार पुरस्कार व हेल्मेट वितरण सोहळा

६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार कार्यक्रम, लोकमत संपादक संजय आवटे यांचे मार्गदर्शन, १० पत्रकारांना दर्पणकार पुरस्कार प्रदान

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I पत्रकार दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई संघटनेच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांसाठी दर्पणकार पुरस्कार व हेल्मेट वितरण सोहळ्याचे आयोजन दिनांक ६ जानेवारी रोजी सकाळी १०:३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध व्याख्याते आणि लोकमतचे संपादक श्री. संजय आवटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमतचे संपादक श्री. संजय आवटे असतील. तसेच, दर्पणकार पुरस्कार व हेल्मेट वितरण राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन आणि पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्यांच्या रूपात आ. राजुमामा भोळे, आ. किशोरअप्पा पाटील, आ. मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वरी रेड्डी, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, प्रांताधिकारी विनय गोसावी, लोकमत जळगाव आवृत्तीचे संपादक किरण अग्रवाल यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दर्पणकार पुरस्कार १० जणांना प्रदान केला जाणार आहे. यामध्ये प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल मीडिया आणि छायाचित्रकार यांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांना सन्मानित करण्यात येईल. पुरस्कार प्राप्त पत्रकारांची यादी पुढीलप्रमाणे आहे:

प्रिंट मीडिया:

चंद्रशेखर जोशी (तरुणभारत)

सुनील पाटील (लोकमत)

सुधाकर जाधव (दिव्यमराठी)

चेतन साखरे (देशदूत)


इलेक्ट्रॉनिक मीडिया:

किशोर पाटील (किशोर पाटील)

संजय महाजन (साम TV)

विजय वाघमारे (न्यूज 18 लोकमत)


डिजिटल मीडिया:

नरेंद्र पाटील (पुढारी)

निलेश पाटील (महाराष्ट्र टाइम्स डिजिटल)


छायाचित्रकार:

सचिन पाटील (लोकमत)

पत्रकार संघाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व पत्रकार, पत्रकार संघाचे सदस्य, पत्रकारितेचे विद्यार्थी तसेच नागरिकांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने