स्थानिक गुन्हे शाखेने अकुलखेडा गावाजवळ गांजा वाहत आणणाऱ्या दोघांवर कारवाई केली; ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर चोपडा ते शिरपूर रोडवरील अकुलखेडा गावाजवळ दुचाकीवरून गांजा वाहत आणणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत ३६ हजार रुपयांचा ४ किलो ५०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील भोरखेडा येथील विजय देवराम मोरे (वय २८) आणि धरणगाव तालुक्यातील वाघळूद येथील अविनाश भिका पाटील (वय २६) हे दोघे शिरपूरकडून चोपडा शहराकडे दुचाकीवरून जात होते. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अकुलखेडा गावाजवळ त्यांना थांबवून चाचपणी केली. तपासादरम्यान त्यांच्या कडून ३६ हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी दोघांविरुद्ध चोपडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांनी गांजा विक्रीच्या उद्देशाने तो चोपडा शहरात आणला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई शहर पोलीस निरीक्षक श्री. मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि एकनाथ भिसे, गणेश वाघमारे, अनिल जाधव, विलेश सोनवणे, दीपक माळी, रवींद्र चव्हाण, रवींद्र पाटील, हेमंत पाटील, प्रदीप चावरे, जितेंद्र चव्हाण, गोकुळ सोनवणे, योगेश बोडखे, विनोद पाटील यांच्याद्वारे केली गेली.
पोलिसांनी या दोघांना अटक करून अधिक तपास सुरू केला आहे.
टिप्पणी पोस्ट करा