Top News

जळगावात शिक्षण विभागाच्यावतीने ५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन


दि. १८ व १९ जानेवारी रोजी भरविण्यात येणार, जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदारांची प्रमुख उपस्थिती

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I 
जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने ५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन १८ ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत सेंट टेरेसा कॉन्व्हेंट इंग्लिश मिडीयम हायर सेकंडरी स्कुल जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.

राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर व शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांच्यावतीने दि. १८ ते १९ जानेवारी २०२५ या दोन दिवशीय ५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२४ - २५ चे आयोजन सेंट टेरेसा कॉन्व्हेंट इंग्लिश मिडीयम हायर सेकंडरी स्कुल, टेरेसा नगर, शिरसोली रोड, मेहरूण तलाव, जळगाव याठिकाणी भरविण्यात येणार आहे.  या कार्यक्रमाचे उदघाटन समारंभ १८ रोजी सकाळी १० वाजता होणार तसेच पारितोषिक वितरण समारंभ दि. १९ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे.

कार्यक्रमाचे उदघाटन समारंभ

कार्यक्रमाचे उदघाटन समारंभ दि. १८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री, क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे राहणार आहे. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.  

यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती
खा. स्मिता वाघ, आ.एकनाथराव खडसे, आ. किशोर दराडे, आ. सत्यजित तांबे, आ. सुरेश (राजूमामा) भोळे, आ. किशोर पाटील, आ.चंद्रकांत सोनवणे, आ. अनिल भाईदास पाटील, आ. चंद्रकांत पाटील, आ. मंगेश चव्हाण, आ. अमोल पाटील, आ. अमोल जावळे, जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, नाशिक विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक मा.डॉ. बी. बी. चव्हाण, डायटचे प्राचार्य मा.डॉ. अनिल झोपे आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे.

समारंभाला सहकार्य लाभणार
यावेळी जिल्हा परिषद जळगावचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) सचिन परदेशी, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) ई. आर. शेख, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) एफ. ए. पठाण, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) रागिणी चव्हाण, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रतिभा सानप, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) व्ही. डी. सरोदे, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) एन एफ चौधरी, सेंट टेरेसा कॉन्व्हेंट इंग्लिश मिडीयम हायर सेकंडरी स्कुलचे व्यवस्थापन समिती व कर्मचारी, जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, सर्व विद्यालयातील मुख्याध्यापक व मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी तसेच जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, जळगाव आदींचे या समारंभाला सहकार्य लाभणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने