सुनिल सोनवणे यांची फसवणूक करणाऱ्या प्रमोद कामत याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिसांत गुन्हा दाखल
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील वाघ नगरात राहणारे सुनिल बाबुलाल सोनवणे (वय ४५) हे एमआयडीसीमध्ये चटई कंपनी चालवतात. याठिकाणी काम करणाऱ्या ठेकेदाराने सुनिल सोनवणे यांच्याकडून एक लाख रुपये आणि त्यांची कार घेऊन मध्यप्रदेशात जाऊन त्यांना फसवणुकीचा सामना करावा लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद नानटेक कामत (मूळ रा. दरभंगा, बिहार, साई सिटी, कुसुंबा) हा ठेकेदार दोन वर्षांपासून सोनवणे यांच्या कंपनीसाठी काम करणाऱ्या मजुरांची व्यवस्था करीत होता. याच कारणामुळे सोनवणे यांचा प्रमोद कामत याच्यावर पूर्ण विश्वास होता, आणि त्याने कधीही कामाच्या बाबतीत तक्रार केली नव्हती.
पण, १५ सप्टेंबर २०२४ रोजी प्रमोद कामत याने सोनवणे यांना फोन करुन सांगितले की, त्याचे वडील मध्यप्रदेशात अचानक आजारी पडले आहेत. त्यासाठी सोनवणे यांच्याकडून कार आणि एक लाख रुपये घेतले. त्यानंतर आठ-दहा दिवसांनी, सोनवणे यांनी कामतला फोन करून त्याच्या वडीलांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि कामावर कधी येणार याबाबत विचारले. त्यावर कामतने त्याला उशिर लागेल असे सांगितले, आणि कारसुद्धा परत करायला वेळ लागेल असे सांगितले.
काही काळानंतर सोनवणे यांनी कामतला वारंवार फोन केला, परंतु प्रत्येक वेळी कामत वेगवेगळी कारणे देत वेळ टाळत होता. त्यानंतर सोनवणे यांना आपली फसवणूक झाल्याची खात्री झाली आणि त्यांनी १८ जानेवारी रोजी रामानंद नगर पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलीसांनी प्रमोद कामत याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सोनवणे यांचे असे मानले जात आहे की, ठेकेदाराने त्यांची कार आणि पैशांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली असून पोलीस सध्या तपास करत आहेत.
याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा