Top News

संदलमधील आक्षेपार्ह फलकांवर हिंदू राष्ट्र समन्वय समितीची कारवाईची मागणी


सावदा पोलीस स्थानकात धार्मिक भावना दुखावल्याबद्दल गुन्हा दाखल, समितीने राज्यभर अशा फलकांवर बंदी घालण्याची मागणी केली

जळगाव अपडेट न्यूज, रावेर, रोहित चव्हाण I
जिल्ह्यात मुस्लिम समुदायाने काढलेल्या संदल (मिरवणूक) मध्ये हिंदू समाजाच्या भावना दुखावणारे व धार्मिक वाद निर्माण करणारे फलक प्रदर्शित करण्यात आले. या संदलमध्ये औरंगजेब व ओवैसी बंधूंचे फलक झळकावण्यात आले, ज्यामुळे स्थानिक हिंदू समाजामध्ये रोष निर्माण झाला आहे. याबाबत आज हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच सावदा पोलीस स्थानकात  धार्मिक भावना दुखावल्याबद्दल एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणावर हिंदू राष्ट्र समन्वय समिती (यावल - रावेर विभाग) ने त्वरित प्रतिक्रिया दिली आणि जिल्ह्यात आणि राज्यात अशा प्रकारच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या फलकांवर बंदी घालण्याची मागणी केली. समितीच्या वतीने एक निवेदन नायब तहसीलदार श्री. काकडे यांच्या अनुपस्थितीत नायब तहसीलदार श्री. जगदीश गुरव यांना सादर करण्यात आले. यावेळी समितीचे सर्वश्री निलेश चौधरी, अमोल निंबाळे, धीरज भोळे, यशवंत चौधरी, स्वप्नील पवार, ऋषिकेश मराठे, निखिल माळी आणि सावदा, वाघोदा येथील धर्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समितीने दिलेल्या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत: १. महाराष्ट्रात औरंगजेबचे सार्वजनिक पणे उदात्तीकरण करणारे फलक आणि त्याच्या इतर कृत्यांवर बंदी घालण्यात यावी. २. 'हिंदू कार्यकर्त्यांनी अफझलखान वधाच्या फलकावर कारवाई करणारे पोलीस अशा वेळी तक्रार करणाऱ्याची वाट पाहून वेळ घालवतात, ज्यामुळे आरोपींना पुरावा नष्ट करण्याची संधी मिळते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलिसांनी स्वतःहून गुन्हा नोंद करावा' असा मुद्दा उपस्थित केला. ३. संदलमध्ये आक्षेपार्ह फलक पकडल्याबद्दल संबंधित व्यक्तींवर आणि आयोजकांवर गुन्हा नोंदवला जावा.

सावदा पोलीस स्टेशन येथे या संदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर, पोलीस उप निरीक्षक विशाल पाटील यांनी तत्परतेने गुन्हा नोंदवला. भारतीय दंडसंहितेच्या कलम २९९ अंतर्गत धार्मिक भावना दुखावल्याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस विभागाने संबंधित आरोपींच्या विरोधात कठोर कारवाईची ग्वाही दिली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने