जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर २५ जानेवारी २०२५, शनिवार रोजी सकाळी ८ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
शासकीय आयुर्वेदिक व वैद्यकीय रुग्णालयांच्या सहकार्याने आणि विजयरथ बहुउद्देशीय संस्थेच्या मदतीने हे शिबिर आयोजित केले आहे. रामेश्वर कॉलनीतील श्री स्वामी समर्थ केंद्र चौक, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर, बालाजी किराणाच्या बाजूला, मेहरून जळगाव येथे हे शिबिर होईल.
या महाआरोग्य शिबिरात विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या आणि उपचारांचे आयोजन केले आहे. यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, पॅरालीसीस, त्वचा विकार, पचनसंस्थेसंबंधी विकार, गर्भिणी तपासणी व प्रसुती, पंचकर्म, आयुर्वेदिक चिकित्सा, स्त्रियांच्या आजारांवर उपचार, लहान बालकांतील सर्व रोगनिदान व उपचार, सुवर्णप्राशन, डोळ्यांची मोफत तपासणी आणि मोतीबिंदूंचे मोफत ऑपरेशन यांचा समावेश आहे.
यावेळी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांचे विशेष सहकार्य लाभणार असून, समाजसेवक आशुतोष पाटील आणि विजयरथ बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अमोल बाविस्कर यांचीही उपस्थिती राहील. जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आजोबांच्या वतीने कळविण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा