Top News

बसमध्ये चढत असताना महिलेच्या पर्समधून ९५ हजार रुपये किंमतीचे दागिने लंपास

जळगाव शहरातील नवीन बसस्थानकातील घटना, जिल्हापेठ पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहरातील नवीन बसस्थानक आवारातील प्लॅटफॉर्म नंबर ५ वर बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्यांनी ९५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने चोरले. ही घटना सोमवारी, २० जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता घडली.  

घटनेची माहिती मिळाल्यानंतर महिलेने बस स्थानक परिसरात शोध घेतला, पण चोरट्यांचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. महिला दीपिका अजय कुमार तिवारी (वय ३२, रा. सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजी नगर) नातेवाईकांना भेटण्यासाठी जळगावमध्ये आल्या होत्या. त्यानंतर त्या गावाकडे जाण्यासाठी जळगाव बस स्थानकावर आल्या होत्या. बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समधून ९५ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरून नेले.

घटनेचा उलगडा झाल्यानंतर, २१ जानेवारी रोजी महिला जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली. त्यानंतर अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस कॉन्स्टेबल अलका शिंदे या प्रकरणाचा तपास करत आहेत.संपूर्ण शहरात गुन्ह्याचा तपास सुरू आहे. पोलीसांनी नागरिकांना सावध राहण्याची आणि अनधिकृत व्यक्तींवर लक्ष ठेवण्याची सूचना केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने