Top News

जळगाव शहरात खंडणीचा गुन्हा दाखल - संशयित आरोपी अटकेत


ईच्छादेवी चौकातील वाईन शॉपवर मॅनेजरला संशयित आरोपीने चाकुचा धाक दाखवित मागितली खंडणी; पोलिसांनी केली अटक

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील ईच्छादेवी चौकातील वाईन शॉपीवर रात्रीच्या सुमारास संशयित रिजवान गयासोद्दीन शेख उर्फ कालीया याने चाकूचा धाक दाखवून दारुची खंडणी घेतल्याची घटना घडली. याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, आकाशवाणी ते ईच्छादेवी चौफुली दरम्यान असलेल्या अशोका लिकर शॉपीवर राजेश साधूराम कार्डा हे मॅनेजर म्हणून काम करतात. रिजवान शेख उर्फ कालीया हा शहरातील तांबापूरा परिसरातील रहिवासी असून तो पूर्वीपासूनच लिकर शॉपीवर चाकूचा धाक दाखवून दारु घेवून जात होता.

दि. १२ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास रिजवान शेख शॉपीवर आला आणि तो त्याच्या कमरेला लावलेला चाकू दाखवून मॅनेजर राजेश कार्डा यांना धमकावत म्हणाला, "ये दारुकी दुकान चालू रखनी है, तो तुझे डेली दारु का बंफर नहीं दिया तो सबको मार डालूंगा, तुम्हारी दुकान चलने नहीं दूंगा." यानंतर, त्याने शॉपमधून एक बंफर आणि दोन कॉटर दारु घेवून जात तेव्हा राजेश कार्डा यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली.

त्यानुसार, जिल्हापेठ पोलिसांनी संशयित रिजवान गयासोद्दीन शेख उर्फ कालीया याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला. पोलीसांनी त्याला एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, संबंधित अधिक तपास केल्यानंतर आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने