जळगावच्या पालकमंत्रिपदाच्या स्पर्धेत गुलाबराव पाटील, गिरीश महाजन यांच्यात होणार संघर्ष; पाटीलंचा थेट इशारा ‘आगाऊपणा सहन करणार नाही’
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I राज्यात सध्या भाजपाच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर काही महिने उलटल्यानंतरही पालकमंत्रिपदाचं वाटप अद्याप झालेलं नाही. यावरून राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः जळगाव जिल्ह्याचं पालकमंत्रिपद कोणाला मिळणार याबद्दल भाजपामध्ये चर्चेला उधाण आले आहे. यावर गुलाबराव पाटील यांनी जळगावच्या एका कार्यक्रमात इशारा देत विरोधकांना थेट आव्हान दिलं आहे.
गुलाबराव पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून स्पष्ट शब्दांत म्हटलं, “मी कोणाचं नाव घेत नाही, परंतु, जर कोणीतरी आगाऊपणा केला आणि माझ्या कार्यकर्त्यांकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर पालकमंत्री काय असतो हे दाखवून देईन. जळगावात कोणाचीही दादागिरी चालणार नाही. दादागिरी अजिबात खपवून घेणार नाही.” यामुळे राजकारणात नव्याने चर्चेला रंग चढला आहे.
गुलाबराव पाटील यांना देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये पाणीपुरवठा व स्वच्छता खातं दिलं आहे. मात्र, जळगावचा पालकमंत्रिपदाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला एक महिना उलटला असून, गुलाबराव पाटील यांनी यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये देखील जळगावचे पालकमंत्री म्हणून कार्य केले आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्याचं पालकमंत्रिपद त्यांना मिळावं यासाठी पाटील सतत प्रयत्नशील आहेत.
तसेच, भाजपाचे नेते आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे देखील जळगावच्या पालकमंत्रिपदासाठी गुलाबराव पाटलांबरोबर स्पर्धेत आहेत. या स्पर्धेत कोण जिंकणार हे लवकरच स्पष्ट होईल.
गुलाबराव पाटील यांचा इशारा त्वरित राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. पालकमंत्रिपदाच्या वाटपावर वेगवेगळ्या धडाकेबाज प्रतिक्रिया येत आहेत. आता पाहणे असं राहील की, जळगावचे पालकमंत्री कोण होतात आणि राजकारणात पुढे काय होतं.
टिप्पणी पोस्ट करा