जळगावमध्ये नायलॉन मांजा विक्रीचा पर्दाफाश, आरोपी जेरबंद, तेराशे रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I सुप्रीम कॉलनी परिसरात बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करत असलेल्या दिनेश लक्ष्मण चौधरी (वय ३५, श्रीकृष्ण नगर, सुप्रीम कॉलनी, जळगाव) याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळालेल्या माहितीनुसार, या आरोपीला सुप्रीम कॉलनी परिसरात ताब्यात घेऊन त्याच्याकडून तेराशे रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार राजेश मेंढे, रवींद्र नरवाडे, अतुल वंजारी आणि अक्रम शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. आरोपीविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
नायलॉन मांजा वापरणे आणि विक्री करणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने धोकादायक असून, पोलिसांची ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा