Top News

मोठी बातमी I जळगाव जिल्हा पालकमंत्रीपदी गुलाबराव पाटील यांची वर्णी


नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन 

जळगाव अपडेट न्यूज, मुंबई, वृत्तसंस्था I राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गुलाबराव पाटील तर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद, आणि अजित पवार यांच्याकडे पुणे व बीड जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांचं नाव यादीतून वगळण्यात आले आहे.

पालकमंत्री यादीतील अन्य नेत्यांची नावे पुढीलप्रमाणे:

गडचिरोली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे, बीड- उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर, अमरावती- चंद्रशेखर बावनकुळे

वाशीम- हसन मुश्रीफ

सांगली – चंद्रकांत पाटील

रायगड- आदिती तटकरे

आहिल्यानगर- राधाकृष्ण विखे-पाटील

पालघर- गणेश नाईक

जालना- पंकजा मुंडे

सातारा- शंभूराज देसाई

कोल्हापूर – प्रकाश आबिटकर- माधूरी मिसाळ

लातूर- शिवेंद्रराजे भोसले

सोलापूर- जयकुमार गोरे

छत्रपती संभाजी नगर- संजय शिरसाट

मुंबई उपनगर- आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा

रत्नागिरी- उदय सामंत

नाशिक – गिरीश महाजन

सिंधुदुर्ग- नितेश राणे

हिंगोली – नरहरी झिरवळ

बुलढाणा- मकरंद जाधव-पाटील

अकोला – आकाश फुंडकर

नांदेड- अतुल सावे

धुळे – जयकुमार रावल

जळगाव- गुलाबराव पाटील

यवतमाळ- संजय राठोड

चंद्रपूर – अशोक उईके

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने