फॉल्टी मीटरचा सकारात्मक अहवाल देण्यासाठी ४,००० रुपये स्वीकारताना सहाय्यक अभियंता, लाईनमन व तंत्रज्ञांना एसीबीने केली कारवाई
जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I वीज कंपनीतील सहाय्यक अभियंत्यांसह दोन लाईनमनवर एसीबीने कारवाई केली आहे. या कारवाईत वीज मीटर फॉल्टी असल्याचे सांगून सकारात्मक अहवाल देण्यासाठी २०,००० रुपयांची लाच मागितली होती, परंतु तडजोडीअंती ४ हजार रुपये स्वीकारताना सहाय्यक अभियंता कविता भरत सोनवणे, लाईनमन संतोष सुकदेव इंगळे, आणि वरिष्ठ तंत्रज्ञ कुणाल अनिल चौधरी यांना अटक करण्यात आली.
ही कारवाई गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास पाडळसे, ता. यावल येथे करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, श्रीमती नेत्रा जाधव, पीएसआय दिनेशसिंग पाटील, पोना किशोर महाजन, आणि पो कॉ राकेश दुसाने यांच्या पथकाने ही कारवाई केली.
वीज कंपनीतील लाचखोरांच्या वर्तुळात या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा