Top News

ब्रेकिंग I इंडोफिल कंपनीचा बनावट बुरशीनाशक तयार करणाऱ्या धंद्यावर कृषी विभागाची मोठी कारवाई

भुसावळ येथील छाप्यात ३ लाख ८७ हजार ३६० रुपयांचा बनावट बुरशीनाशक मुद्देमाल जप्त, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I भुसावळ शहरातील वाल्मिक नगर येथे इंडोफिल इंडस्ट्रीज लिमिटेड, मुंबई कंपनीच्या बनावट एम ४५ बुरशीनाशक तयार करणाऱ्यांवर कृषि विभागाने धडक कारवाई केली आहे. अधिकृत उत्पादन असलेल्या मॅंकोझेब ७५% WP या बुरशीनाशकाचे बनावट उत्पादन तयार करून त्याची विक्री शेतकऱ्यांना केली जात होती.

सदर बनावट बुरशीनाशकाची विक्री, ब्रँड नेम, कंपनीचा लोगो, रंगाची संगती असलेली बनावट पाकिटे तयार केली जात होती. याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यावर जिल्हा गुण नियंत्रण पथकाचे अधिकारी विकास बोरसे, विजय पवार यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली.

या कारवाईच्या नियोजनासाठी विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के, पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शन लाभले.

संचालित कारवाईत संशयित ठिकाणी छापा टाकला असता, तिथे विना परवाना बुरशीनाशक तयार करत असल्याचे स्पष्ट झाले. तसेच, बनावट एम ४५ बुरशीनाशकाची १०१० पाकिटे, बुरशीनाशक म्हणून वाल पुट्टीच्या बॅग्स, सिलिंग मशीन व बनावट पाकिटे जप्त करण्यात आली. या छाप्यात ३ लाख ८७ हजार ३६०/- रुपयांचा मुद्देमाल सापडला.

संशयित आरोपींना परवाना, उत्पादन कागदपत्रे, पुरवठादारांची माहिती विचारल्यावर त्यांच्याकडे काहीही कागदपत्रे उपलब्ध नसल्याने याबाबत बाजारपेठ पोलिस स्टेशन, भुसावळ येथे अधिकृत उत्पादक प्रदीप झा यांच्यावतीने फिर्याद दाखल करण्यात आली. पुढील कारवाई पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत प्रदीप द्याडे कृषी अधिकारी पंचायत समिती भुसावळ, मानसिंग भोळे कृषी सहायक भुसावळ, सुमन राठोड म.पो.कॉ., प्रशांत परदेसी यांचा सहभाग होता. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने