Top News

अतिक्रमित टपरी राहू देण्यावरून नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण


अमळनेर येथील कोंबडी बाजारमध्ये दोन्ही भावांनी अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांना केली मारहाण, पोलीस स्थानकात नोंद

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I अतिक्रमित टपरी राहू देण्याच्या कारणावरून दोन भाऊंनी नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकातील अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजता कोंबडी बाजार भागात घडली. याप्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख राधेश्याम अग्रवाल हे कोंबडी बाजार भागात रस्त्याच्या कामाच्या निरीक्षणासाठी हजर होते. त्यावेळी जितेंद्र साळुंके आणि दशरथ साळुंके (रा. गुरुकृपा कॉलनी) हे दोघे भाऊ आले आणि त्यांच्याशी संवाद साधला. त्यांना सांगितले की, आपली टपरी अतिक्रमित आहे आणि रस्त्याच्या कामामुळे ती काढली जाईल. त्यांनी याबद्दल अग्रवाल यांच्याकडे विनंती केली की ती टपरी काढू नका. अग्रवाल यांनी त्यांना सांगितले की, या बाबीची माहिती मुख्याधिकाऱ्यांना द्या. यावर साळुंके बंधूंना राग येऊन त्यांनी अग्रवाल यांना मारहाण केली. त्यानंतर इतर कर्मचाऱ्यांनी अग्रवाल यांना तातडीने दवाखान्यात दाखल केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने